देशातील सर्व खेड्यात वीज पोहचवण्याचं मोदींचं स्वप्न झालं पूर्ण

टीम महाराष्ट्र देशा- देशातील सर्व खेडय़ांमध्ये वीज पोहोचली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी यांनी रविवारी खेडय़ांच्या विद्युतीकरणाबाबत अनेक ट्वीट केले. मणिपूरमधील लिसांग या खेडय़ात शनिवारी वीजपुरवठा सुरू झाला असून आता देशातील शेवटचे गावदेखील प्रकाशमान झाले आहे. २८ एप्रिल २०१८ हा देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. भाजपप्रणीत एनडीए सरकारने दिलेले सर्वात मोठे वचन पूर्ण केले, असे मोदी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

अन्न,वस्त्र, निवाऱ्या इतकीच आज भारतातील खेड्या खेड्यात वीजेची गरज आहे. देशातील प्रत्येक खेड्या-पाड्यात वीज पोहचवणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट होतं. 1000 दिवसांच्या आत देशातल्या सर्व खेड्यांमध्ये वीज पोहचण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घालून दिलेलं उदिष्ट पूर्ण झाल्याची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरून दिली आहे.