मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता !

वेब टीम- पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता आहे.

देशातल्या पाच कोटी ऊस उत्पादक शेतक-यांचे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे प्रलंबीत आहे ते सरकारने त्वरीत द्यावे. 20 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी 55 रूपयांऐवजी 100 रूपये अनुदान द्यावे. 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा, इथेनॉलचा दर प्रति लिटर 53 रूपयापर्यंत वाढवावा आणि कारखान्यांकडून सुरु असलेली कर्जाची वसुली त्वरित थांबवावी,कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे व त्याच्या सूचन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला सरकारने द्याव्यात अशी मागणी केली.

सकुमा नावाच्या दिल्लीच्या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात २० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली. देशातील साखरेचे दर पाडण्यासाठीच्या षडयंत्रातून ही आयात केली आहे असा आरोप करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.