मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा प्रारंभ, एक लाख लोकांना मिळकत प्रमाणपत्रांचं वितरण

नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजने अंतर्गत मिळकत प्रमाणपत्र वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. २३ एप्रिल रोजी या योजनेचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आज देशाच्या विविध भागातील एक लाख लोकांना ही प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.यावेळी पंतप्रधानांनी विविध राज्यातल्या लाभार्थी मिळकत धारकांशी संवाद साधला.

देशातल्या प्रत्येक गावाला आणि गरीब व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्याचा आपण संकल्प केला असून स्वामित्व योजना यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले. या योजनेंतर्गत येत्या तीन चार वर्षात देशातील सर्वच मिळकतधारकांना त्यांच्या प्रॉपटी कार्डाचे वितरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

घर किंवा जमीन मालकांना त्यांच्या मालमत्तांचा विना कटकट स्वामित्व हक्क या योजनेमुळ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या मालमत्तांवर आता कोणी वाकडा डोळा ठेऊ शकणार नाही. ही कागदपत्र बँकेत सादर करून घरमालकांना त्यावर कर्जही घेता येईल. त्यातून त्यांना आपला व्यवसाय धंदा उभारता येईल असं पंतप्रधान म्हणाले.

या योजनेमुळे लाभार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मजबुती मिळाली आहे. या योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिण्यात आलं. लाभार्थ्यांना हे कार्ड आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही लिंक मिळणार आहे. जे ‘संपत्ती कार्ड’ डाऊनलोड करू शकतात.

महत्वाच्या बातम्या –