‘कोरोना’ नंतर ‘मंकीपॉक्सच’ संकट भारतावर ?; ‘केंद्र सरकार’ एक्शन मोडमध्ये !

कोरोना

कोरोना(Corona) आजराने संपूर्ण जग थांबले असताना २ वर्षांनंतर सर्व पूर्वपदावर आले. कोरोना(Corona) आजार हा एवढा भयंकर ठरला कि आपल्यातील अनेक लोक आपल्याला सोडून गेले काहींचे नोकरी गेली तर काहींचे व्यवसाय बुडाले.सध्याही काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण भारतात आढळत असले तरी रुग्णांचा आकडा कमी प्रमाणात आहे.

पुन्हा एकदा जग नव्या आजाराच्या विळख्यात पडत असल्याचे दिसत असून मंकीपॉक्स(Monkeypox) च संकट जगाभोवती फिरत आहे मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे जो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय रेनफॉरेस्ट भागात आढळतो, १५ दिवसात १५ देशात हा आजार पसरलेला असून इंग्लंड मधील मंकीपॉक्स(Monkeypox) रुग्णाला २१ दिवसासाठी क्वारंटाईन करण्याचे आदेश तेथील प्रशाशनाने दिले आहे. World Health Organization. ने हा आजार गंभीर स्वरूपाचा असून वेळेचं सावध राहणे गरजेचे आहे असे सूचित केले आहे. तसेच एक रुग्ण कोणत्याही देशात जर सापडला तर उद्रेक मानण्यात येईल असेही WHO म्हणाले.

मुंबई तयारीत !
मुंबई महानगरपालिका पूर्ण तयारीत असून कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये २८ बेड्सचा आयोसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे.

जगभरात २ आठवड्यात मंकीपॉक्स(Monkeypox) रुग्णाचा आकडा हा १०० च्या पुढे गेला असल्याचे समजते दिलासादायक बाब अशी कि एक हि मृत्यू ची नोंद अद्याप झालेली नाही अलीकडच्या काळात, मृत्यूचे प्रमाण सुमारे 3-6% आहे..

मंकीपॉक्स हे एक व्हायरल इन्फेक्शन असून १९५८ मध्ये माकडाला झालेले होते १२ वर्षांनंतरमाणसांनाही होत असल्याचे समोर आले. डोळे, नाक, तोंडाच्या माध्यमातून मंकीपॉक्स(Monkeypox) पसरतो. स्पर्श केल्यास संक्रमण होते. सुरवातीला मंकीपॉक्स झाल्यास ताप, सर्दी,अंगदुखी,हातपाय थरथर करणे, डोकेदुखी इत्यादी लक्षणे आढळतात त्यांनतर चेहऱ्यावर पुळ्या येणे सुरु होते.

महत्वाच्या बातम्या –