मान्सून अंदमानात दाखल

मुंबई: मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे. यानंतर पुढील काही तासात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, आणि तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात दाखल होईल.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने यावर्षी पाऊस सामान्य रहाणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.