मोठी बातमी- शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मान्सून अंदमानमध्ये दाखल

दुष्काळाच्या झळांनी हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २२ मे रोजी अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला मान्सून चार दिवस आधीच दाखल झाला आहे. स्कायमेट हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अंदमान निकोबार आणि दक्षिण बंगालचा उपसागर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे.

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील लवकर येण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत अंदमानात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता आहे. स्कायमेटने मात्र यंदा सरासरीहून कमी ९३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

बिटापासून बर्फीनिर्मिती

Add Comment

Click here to post a comment