नागपुरात हिवाळा कायम ; परतीच्या पावसाने धास्तावले शेतकरी

नागपुरात हिवाळा कायम ; परतीच्या पावसाने धास्तावले शेतकरी rain umbrella

फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील नागपूरमधून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेले दिसून येत नाही आहे. परतीच्या पावसाने विदर्भातील धानासह अन्य पिकांना जबरदस्त फटका बसला असून शेतकरी हवालदील झाले आहेत. काल म्हणजेच ३ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटेपासूनच नागपूर शहरात पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळी आलेल्या पावसामुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

उत्तर प्रदेश, बिहार, आसाममध्ये पावसाचा तडाखा ; 170 जणांचा मृत्यू

मंगळवारीदेखील पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काल म्हणजेच ३ फेब्रुवारी २०२० रोजी दिवसभरात शहरात ०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारी म्हणजेच आज ४ फेब्रुवारी रोजी देखील नागपूरसह विदर्भात पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस येऊ शकतो. ७ फेब्रुवारीपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

सांगली शहराला महापुराचा मोठा फटका ; 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर

तर परतीच्या पावसाने धान, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. एकेकाळी आकाशाकडे पावसासाठी डोळे लावून बसलेला बळीराजा आता हा पाऊस थांबावा म्हणून आकाशाला साकडे घालतो आहे.एकीकडे धानाला अंकूर फुटत आहेत तर दुसरीकडे कापूस भिजून सडतो आहे अशी अवस्था विदर्भातील अनेक गावांमध्ये, शेतांमध्ये दिसून येते आहे.