या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री

नागपूर : आजपासून नागपूरमध्ये सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या व सिडको जमीन घोटाळ्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांनी आखली असल्याचं पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे सरकारने देखील पावसाळी अधिवेशनाची जय्यत तयारी केली आहे. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. हे अधिवेशन शेतकरी केंद्रित असेल व शेतक-यांच्या समस्येवर सखोल चर्चा करून त्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले ते मंगळवारी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे बोलतना म्हणाले की, अधिवेशनात २७ विधेयकांवर चर्चा करण्यात येणार आहे. राज्याचे दूध धोरणदेखील याच अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू असून, आणखी ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. पीककर्जाच्या वाटपालादेखील वेग येतो आहे. जोपर्यंत अखेरच्या शेतक-याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

https://maharashtradesha.com/mumbai-shivsena-mla-important-meeting-in-matoshree-454557/

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज पासून