आठवडाभर विश्रांतीनंतर मॉन्सूनची वेगाने वाटचाल; देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल

काही दिवसापूर्वीच अरबी समुद्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले होते. ते निवळल्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि त्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. तसेच आज मॉन्सूनने राजस्थानमधील काही ठिकाणांपर्यंत मजल मारली.

‘शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीपूर्व कामे लॉकडाऊनमुळे रखडू नयेत याची दक्षता घ्या’

तसेच हवामान विभागाने राजस्थान, चंडीगड, उत्तर पंजाबच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे सांगितले. मॉन्सूनने दोन दिवसांत वेगाने वाटचाल केली आहे. तसेच आज उत्तर आणि वायव्य भारताच्या अनेक भागांत मजल मारत देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल झाला.

कोरोनामुळे मृत्यु झाला तर महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान

त्याचप्रमाणे मॉन्सूनने गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्‍मीर यांचा संपूर्ण भाग व्यापला आहे. मात्र मॉन्सूनने आठवडाभर विश्रांती घेऊन त्याने त्याची वाटचाल पुन्हा सुरू केली आहे. याच दरम्यान मॉन्सूनसाठी पोषक हवामान असल्याने, तो पुढील वाटचालीस म्हणजे आज राजस्थान, पंजाब, हरियानाचा त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा काही भागत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Diabetes रुग्णांना डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे

मजुरांच्या बँक खात्यात सरकार टाकणार दोन हजार रुपये; अशी करा नोंदणी