पूरस्थितीतही ‘या’ जिल्ह्यात ८००० हून अधिक जणांचं लसीकरण

कोरोना

मुंबई – देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आघाडी कायम राखलेल्या महाराष्ट्रानं काल आणखी एक विक्रम नोंदवला. राज्यात लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. राज्यातल्या एक कोटी 64 हजार 308 नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.

राज्यात २६ जुलै सायंकाळी चार वाजेपर्यंत सुमारे 4 हजार 100 लसीकरण केंद्राद्वारे पावणेचार लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. आरोग्य विभागानं केलेल्या या लक्षणीय कामगिरीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे ट्रान्सपोर्ट सेवेसहीत लसीकरण मोहिमेलाही फटका बसल्याचं राज्याचे अतिरिक्त आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी म्हटलंय. उदाहरण द्यायंच झालं तर रत्नागिरीत काल ४०० हून कमी नागरिकांचं लसीकरण झालं. परंतु, पूरस्थितीतही रायगडमध्ये ८००० हून अधिक जणांचं लसीकरण करण्यात आलं. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचं कौतुक केलंय.

महत्वाच्या बातम्या –