मुंबई : अन्नाची नासधूस करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि जामीनही देऊ नका, असे रविना टंडनने म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन रविनाने हे ट्वीट केले आहे.
कधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलणाऱ्या टंडनने नेमके आंदोलनातील नासधुसीवर भाष्य केले आहे. टंडनने हमीभाव, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, पिकांवर रोगराई यावर देखील सरकारला जाब विचारावा अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे.
काय म्हणाली रविना टंडन ?
“अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.”असे अभिनेत्री रविना टंडन हिने ट्वीट केले आहे.
https://twitter.com/TandonRaveena/status/1003165286965510144