VIDEO- राज्यात एकच चर्चा अमृता फडणवीसांच्या सेल्फीची

दिवाळीच्या तोंडावर मुंबई-गोवा प्रवासासाठी नवा पर्याय चालू करण्यात आला आहे. भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या क्रुझला केंद्रीय बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. यावेळी अमृता फडणवीस याही हजर होत्या.

दरम्यान अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या अगदी टोकावर जाऊन सेल्फी घेतला. या प्रसंगाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत अंगरक्षक आणि पोलीस अमृता फडणवीस यांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अमृता फडणवीस सेल्फी काढण्यात मग्न असलेल्या दिसत आहेत. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यानंही डोक्यावर हात मारुन घेतला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जीव धोक्यात घालून क्रुजच्या टोकाला जाऊन सेल्फी काढला आहे यावरून वाद निर्माण झाला आहे. क्रुज सोबत फोटो काढण्याचा मोह अमृता फडणवीस यांना आवरला नाही. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री नव्हते त्या एकट्याच सेल्फी काढत होत्या.