नाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना दीड कोटीचा फटका बसणार

नाफेड

शासनाने तूर खरेदीसाठी ५८०० प्रति क्विंटल भाव घोषित केला आहे. १ जानेवारी पासून नोंदणी सुरू असून १४ फेब्रुवारी, २०२० पर्यत नाव नोंदणीची मुदत आहे. शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार तुर घालण्यासाठी कागदपत्रासह नोंदणी पूर्ण केलेल्या पैठण तालुक्यातील ८०० शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडने अचानक नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नाफेडच्या या निर्णयामुळे १० हजार क्विंटल तूर ही शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या घशात घालावी लागणार आहे.

शेतकऱ्यांनी तूर घालण्यासाठी सातबारा उतारा, चालू बॅंक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड  आदी कागदपत्रासह नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएस आला. मात्र ऐनवेळी शेतकऱ्यांना नाफेडच्या अधिकाऱ्यांनी तुमची नोंदणी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे  तूर आणू नका अशा सूचना दिल्या. त्यात ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तूर घालणीमध्ये  शासनाची आधारभूत किंमत व बाजारातील भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख रूपयाचा फटका बसणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना नोंदणी का रद्द करण्यात आली याबाबत विचारले तर अधिकाऱ्यांनी त्यावर वेगवेगळी कारणे दिलीत. यामुळे तूर खरेदी न करण्याबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –

रायगड जिल्ह्यातलं महाड शहर पाण्याखाली ; चार तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी

कृषी अधिकारी पोहचले बांधावर ; पिकांचे पंचनामे अजूनही सुरुच

आत्महत्येची परवानगी द्या’; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शेतीत वाढतोय आधुनिक यांत्रिक साधनांचा वापर