विदर्भात गेल्या चोवीस तासांत विखुरलेला पाऊस अनुभवण्यात आला असून नागपूर, गोंदिया आणि वर्धा यासारख्या ठिकाणी हलक्या सरींची नोंद करण्यात आली.
वायव्य राजस्थान ते मध्य प्रदेश पर्यंत उत्तर-दक्षिण निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि मराठवाड्यातून जात असल्यामुळे हा पाऊस होत आहे. ही प्रणाली आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने विदर्भात आजही अधून मधून हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण देखील अंशतः ढगाळ असेल.
71 व्या प्रजासत्ताक दिना निमत्त गुगलचे खास डुडल
याशिवाय आणखी एक कमी दाबाचा पट्टा वायव्य राजस्थानपासून गुजरातमार्गे ईशान्य अरबी समुद्रापर्यंत विस्तारत आहे. या प्रणालीमुळे मुंबई, ठाणे आणि डहाणूसह उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच येत्या चोवीस तासांत या शहरांमध्ये अगदी हलका पाऊस होण्याची शक्यता देखील आहे. दुसरीकडे, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र तसेच कोकण व गोव्यातील बहुतेक भागांत वातावरण कोरडेच राहू शकते.
खानदेशात थंडीत वाढ; पारा १४ अंशांवर
आज रात्रीपर्यंत पावसाळी गतिविधी छत्तीसगड आणि ओडिशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता असल्याने हवामान कोरडे होण्यास सुरवात होईल.
उद्यापासून उत्तर कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात वार्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वारा या क्षेत्रांचा ताबा घेईल, ज्यामुळे किमान तापमानात घट होईल. मुंबईतील किमान तापमानाचा पारा १३ ते १५ अंश सेल्सियस दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे आल्हाददायक दिवसानंतर रात्री सुखद गारवा राहण्याची अपेक्षा आहे.
Source- Skymet Weather Team