नाशिक –सध्या राज्यात, तसेच देशात कोरोना आजरांनंतर फसवुकीचे प्रमाण वाढत आहे त्यात ऑनलाईन फसवणूक(Cheating) करण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलीस तसेच सायबर क्राईम सतत करत असते.
नाशिक मध्ये मे महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याकारणाने आज रात्री दि ९ रोजी ९.३० वाजता वीजपूरवठा खंडित करण्यात येणार आहे. परंतु बऱ्याच नागरिकांना फसवुणुकीचे मेसेज येत असून समस्या सोडवण्यासाठी पर्सनल नंबर दिला जात आहे आणि संपर्क करण्यास सांगत आहे. अश्या पद्धतीचे बनावट मेसेज नागरिकांना पाठवले जात आहे व दर्शवले जात आहे कि महावितरण द्वारे हा मेसेज तुम्हाला पाठवण्यात आला आहे. परंतु महावितरण शी संपर्क साधला असता आम्ही कोणत्याही प्रकारचे असे मेसेज करत नाही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुम्हाला येणारे मेसेज तुम्ही दुर्लक्ष करू शकता परंतु त्याला प्रतिसाद देऊ नका अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. असे आवाहन महावितरण द्वारे करण्यात आले आहे.
शंका असल्यास ह्या नंबर वर करा संपर्क(If in doubt contact this number) – १८००२३३३४३५
काही अडचणी किंवा तक्रार करायची असल्यास तुम्ही जवळच्या महावितरण कार्यलयात जाऊन संपर्क साधावा.
महत्वाच्या बातम्या –
- अकोला – अमरावतीचे नाव सातासमुद्रापार; गिनीज बुकात पोहचला महामार्ग!
- खुशखबर : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन,असा करा अर्ज.
- धक्कादायक ! शेतकरी झोपलेला असताना अंगावर टाकले उकळते तेल; शेतक
- जाणून घ्या वीज कुठे पडणार? ‘दामिनी’ अँप द्वारे मिळणार माहिती!
- जाणून घ्या ,कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धत