वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या शेतात नवनीत कौर यांनी केली पेरणी

नवनीत कौर राणा

अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. खासदार असूनसुद्धा त्यांनी शेतात जाऊन पेरणी केल्यामुळे त्यांच्या या साधेपणाचे सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र आता या प्रकरणाने वेगळे स्वरूप धारण केले आहे. नवनीत राणा यांनी सन्नू रामलाल चव्हाण यांच्या शेतात केलेली पेरणी त्यामुळेच वादात सापडली आहे.

या जमिनीवर पेरा करण्यास व्याघ्र प्रकल्पाकडून मनाई करण्यात आली होती. वनजमिनीवरील हे अतिक्रमण असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. सेमाडोह वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक १७६ मध्ये ही शेती करण्यात येत असल्याने आता यासंदर्भात उपविभागीय अधिकऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

राजीनामे मागे घ्या ; अन्यथा पक्षांतरबंदीअंतर्गत कारवाई करू

आमचं खरंच ठरलंय! मुख्यमंत्री आमचाच!- शिवसेना

विरोधी पक्षातल्या खासदाराला लवकरच भाजपमध्ये घेणार – रावसाहेब दानवे