नवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात?, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल

navneet-kaur-rana

लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या खासदार नवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात आल्याचे दिसत आहे. नवनीत राणा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल करण्यात आल्या आहेत. नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ तसेच सुनील भालेराव यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदार संघातून शिवसनेचे आनंदराव अडसूळ हे निवडणुकीच्या रिंगणात होते. अडसूळ यांच्या विरोधात आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उमेदवारी लढली. राणा यांनी अडसूळ यांचा पराभव करत विजय मिळवला. दरम्यान नवनीत राणा यांच्या विरोधात आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी स्वतंत्र दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केल्या.

दाखल केलेल्या याचिकेत लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता, नवनीत कौर राणा या लुभाणा जातीच्या आहेत तरी त्यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि विजय मिळवला, असे याचिकाकर्त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर नवनीत कौर राणा यांनी असे करून मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला आहे. असा आरोप करत त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी याचिकेत याचिकाकर्त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

नवनीत कौर राणा संसदेतून थेट शेतात ; सोयाबीनची केली पेरणी

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?
Loading…