राष्ट्रवादीच्या नेत्याची आदिनाथ साखर कारखान्याच्या सुपरवाझरला मारहाण

करमाळा-  करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या केनयार्ड सुपरवाझरला मारहाण आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन दिग्विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
रविंद्र विठ्ठल शिंदे (वय ५०, रा. चौंडी, ता. जामखेड) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली असून शिंदे हे आदिनाथ कारखान्यात केनयार्ड सुपरवाझर पदावर कार्यरत आहे. दरम्यान चेअरमन बागल यांनी उसाची शिल्लक किती आहे अशी विचारणा केली असता शिंदे यांनी माहिती दिली परंतु बागल यांना समाधान न झाल्याने त्यांनी शिंदे याला शिवीगाळ करून अंगावर धावून मारहाण केली त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी भांडण सोडविले असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकारानंतर आदिनाथच्या कामगारांनी कामबंद आंदोलन केले. दरम्यान आदिनाथ चे चेअरमन संतोष जाधव-पाटील यांनी कामगारांची माफी मागितल्यानंतर कामगारांनी काम सुरू केले.सुमारे तीन तास काम बंद होते.