मुंबईतील पर्यटनस्थळांच्या संवर्धन, विकासासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा- अजित पवार

अजित पवार

मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता या शहरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. शहरातील पर्यटनस्थळांच्या संवर्धन आणि विकासासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिले. पर्यटन विकासाच्या अनुषंगाने शहरातील २२ महत्त्वाच्या ठिकाणांना प्राधान्य देऊन त्यांचा विकास करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जलवाहिनी दुरुस्तीसाठी काम करणाऱ्या अभियंत्यांचे आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

यावेळी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसराचा कलात्मकदृष्ट्या विकास करण्याच्या अनुषंगानेही सादरीकरण करण्यात आले. या परिसराचा हेरिटेज दर्जा कायम राखून त्याचा विकास करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या. यासाठी आवश्यक निधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मुंबई शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. या स्थळांची कलात्मकता, सौंदर्य, हेरीटेज दर्जा कायम राखून विकास आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. शासनामार्फत यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. मुंबई महापालिका, एमएमआरडीए यांनीही आवश्यकतेनुसार निधी द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. शहराच्या पर्यटन विकासासाठी डिपीडिसीमधून निधी देण्यात येईल, असे यावेळी मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

‘पानी फाऊंडेशन’च्या उपक्रमास राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उद्धव ठाकरे

पर्यटनमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता इथली पर्यटनस्थळे त्याच दर्जाची करण्याचे पर्यटन विभागाचे नियोजन आहे. शहरातील २२ प्रमुख पर्यटनस्थळांचे प्राधान्याने जतन, संवर्धन आणि विकास केला जाईल. बॉलिवूड संग्रहालय, क्रिकेट संग्रहालय आदींचीही निर्मिती करण्याचे नियोजन आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या संवर्धन आणि परिसर विकासासाठी नियोजन केले असून त्याचा आराखडा बनविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासासंदर्भात प्रशासकीय आणि इतर कार्यवाही निश्चित वेळेत करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीस वित्त आणि नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

वरखेडा ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी – अजित पवार

निळवंडे धरणाची कामे दोन वर्षात पूर्ण करणार – मुख्यमंत्री