स्ट्रॉबेरी या फळांवर अधिक संशोधन करण्याची गरज – उद्धव ठाकरे

स्ट्रॉबेरी या फळांवर अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी कृषी विभागाला दिल्या आहेत. महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत ते बोलत होते.

जाऊन घ्या दालचीनीचे फायदे….

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाबळेश्वरप्रमाणे परिसरातील पर्यटन स्थळांचा देखील विकास होणे, ती लोकप्रिय होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी कालबद्ध रीतीने मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील असेही ते म्हणाले

‘भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गुरु शिष्याचं नातं’

याप्रसंगी बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न व्हायला हवेत. महाबळेश्वर येथे भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येतात. याठिकाणी बहुभाषिक पोलीस आणि मार्गदर्शक असल्यास विविध भाषिक पर्यटकांना त्याचा फायदा होईल. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंग, कोल्हापूर वन परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ.बेन क्लेमंट, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची उपस्थिती होती.