ऊस दरावरून नेवासा तालुक्याचे राजकारण बदलणार !

नेवासा/भागवत दाभाडे: जवळपास दोन महिने होत आले ऊस हंगाम सुरू झाला आहे. सगळीकडे ऊस तोङणीची घाई सुरू आहे. अहमदनगर जिल्हा मध्ये मोठे सहकारी साखर कारखाने उभे आहे. ते आज ही शेतकर्याची कामधेनु म्हणून ओळखळी जातात. जिल्हा मध्ये मागील दोन महिन्यात ऊस दरावरून मोठे आंदोलने झाली, शेतकर्यावर गोळीबार करण्यात आला त्यात दोन शेतकरी जखमी झाले अनेकांवर गुन्हे दाखल झाले. परंतु, हे सर्व होत असताना शेतकर्याच्या हाती काहिच पङले नाही.

अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णयायक जिल्हा म्हणून ओळखला जातो.या प्रमाणेच अहमदनगर जिल्हात नेवासा तालुक्याचे राजकारण सर्वांना चकित करणारे ठरले आहे. कोणाची कशी जिरवायची हे तालुक्यातील मतदारांना चांगलेच माहिती आहे. सहकारी साखर कारखान्याचा जीवावर मोठे झालेले कारखानदार, संस्था चालक यांनी आज पर्यंत ऊस दरावरून सर्व सामान्य शेतकर्याची पिळवणूक केली आहे. परंतु, याचा सर्व परिणाम प्रत्यक्ष दिसून येत नसला तरी तो येणार्या निवङणूकामध्ये प्रत्यक्ष जाणवल्या शिवाय राहणार नाही. ही तालुक्यात कमी दर देणार्या कारखान्यासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

आज जिल्हामध्ये ज्ञानेश्वर कारखान्याने 2500 रूपये दर देऊन आघाडी घेतली आहे. याच ज्ञानेश्वर कारखान्यावर जिल्हा परीषद, पंचायत समिती निवङणूकी दरम्यान जाहिर सभेत तालुक्याच्या माजी आमदारांनी आरोप केले होते.त्यावेळी जाहिर सभेमध्ये ज्ञानेश्वर कारखाना बुङीत निघाला, भाव देत नाही, आमच्या बरोबरीने भाव दिला नाही तर कारखान्या विरूध्द आंदोलन करू, आमच्या बरोबरीनेच भाव घेऊ असे आरोप केलेला ज्ञानेश्वर कारखाना आज भाव देतो तर त्यांच्या ताब्यात असणार्या मुळा कारखान्याने 2300 रूपये दर देऊन शेतकर्याच्या तोंङाला पाने पुसली आहे. तालुक्याच्या राजकारणामध्ये सत्तेवर येण्यासाठी ऊस भावावरून राजकारण करायचे, सत्तेवर येण्यासाठी शेतकरी नेते म्हणून कळवळा करायचा , परंतु प्रत्यक्षात आज ऊस दर जाहिर करण्याची वेळ आली तर कुठे गेले हे सर्व ठोंग? काय करणार सत्तेवर येऊन तालुक्यासाठी? असा प्रश्न आज तालुक्यातील जनता विचारत आहे.

ज्ञानेश्वर कारखान्याने 2500 तर मुळा कारखान्याने 2300 रूपये दर दिला आहे. हा एकाच तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याने वेगवेगळा दर दिल्याने तालुक्यात याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. नफ्यात असणार्या मुळा कारखान्याने ज्ञानेश्वर पेक्षा जास्त दर का देऊ नये असा प्रश्न आज तालुक्यातील जनता विचारत आहे. लोक प्रत्यक्षात काही म्हणत नसले तरी येणार्या निवङणूकामध्ये याची प्रचिती निश्चित आल्या शिवाय राहणार नाही. मुळा कारखान्याने पण शेतकर्याचा, तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी ज्ञानेश्वर प्रमाणे दर द्यावा अथवा आपले ऊस दर बाबत धोरण जाहीर करावे. अन्यथा याचा विपरीत परिणाम तालुक्याच्या राजकारणावर झाल्या शिवाय राहणार नाही. तालुक्याचे लोकप्रतिनीधी होऊ पाहणार्यासाठी ही धोक्याची घंटा आहे हे निश्चित.