पावसाचा नवा विक्रम: १२२ वर्षानंतर पाहिल्यांदाज ‘या’ भागात पडला ८८.२ मिलीमिटर पाऊस

मिलीमिटर पाऊस

मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार देशातील अनेक राज्यांमध्ये जानेवारी महिन्यात अवकाळी पाऊस पडला.   यावर्षी जानेवारीच्या अवघ्या 23 दिवसांत अवकाळी पावसाने विक्रम केला आहे. देशाची राजधानी दिल्लीत यावर्षी जानेवारी महिन्यात जोरदार पाऊस पडला आहे.  दिली मध्ये मागील महिन्या पासून जोरदार पाऊस पडत आहे, दिल्लीत या महिन्यात आतापर्यंत ८८.२ मिलीमिटर पाऊस (Millimeters of rain) झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत १२२ वर्षानंतर जानेवारी महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. २२ जानेवारीला (शनिवारी) रात्री उशीरा झालेल्या पावसानंतर दिल्लीत यावर्षी जानेवारी महिन्यात एकूण ८८.२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर यापूर्वी दिल्लीत १९८९ मध्ये ७९.७ मिलीमिटर तर १९५३ मध्ये ७३.७ मिलीमिटर पाऊस झाला होता. तर दिल्लीत या महिन्यात आतापर्यंत ८८.२ मिलीमीटर पाऊस (Millimeters of rain) झाल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पपाऊस झाला. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर राज्यात यंदा जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील  रत्नागिरी  जिल्ह्यामध्ये तब्बल 1236 टक्के टक्के अधिक पाऊस झाला. त्याच बरोबर तब्बल १० जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे.  १० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यंदा अवघ्या 23 दिवसांत 32.8 टक्के पाऊस झाला.  अजून आठ दिवस महिना संपण्यास बाकी आहेत, त्यामुळे ही सरासरी आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात या ठिकाणी अवकाळीची अतिवृष्टी

रायगड : 3256 टक्के , रत्नागिरी : 1236 टक्के, गडचिरोली : 840 टक्के, चंद्रपूर : 674 टक्के, सिंधुदुर्ग : 240 टक्के, धुळे : 443 टक्के, अमरावती : 208 टक्के, यवतमाळ : 221 टक्के, नागपूर : 311 टक्के, वर्धा : 321 टक्के, गोंदिया : 83 टक्के, पुणे 82 टक्के, नंदुरबार 94 टक्के.

महत्वाच्या बातम्या –