जिल्ह्यासाठी नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या सुरु काय बंद

पुणे – पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. तर, नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे महापालिकेची नियमावली पुढील प्रमाणे :

 • सोमवारपासून आस्थापनांना सायं. ७ पर्यंत सुरु ठेवता येणार
 • अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
 • अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील.
 • सार्वजनिक वाचनालय सुरू राहतील.
 • कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील.
 • मॉल ५०% क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
 • व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील, मात्र सदर ठिकाणी वातानुकूल ( A.C) सुविधा वापरता येणार नाही.
 • मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
 • शहरातील हॉटेल, बार, रेस्‍टॉरंट, फूड कोर्ट रात्री १०.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहील. पार्सल सेवा रात्री ११.०० पर्यंत सुरु राहील.
 • महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत व दुपारी ०४.०० ते सायंकाळी ०७.०० पर्यंत सुरू राहतील.
 • सर्व आउटडोर स्पोर्ट्स हे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील तसेच इनडोर स्पोर्ट्स सकाळी ०५.०० ते ०९.०० व सायंकाळी ०५.०० ते ०७.०० या वेळेत सुरु राहतील.

महत्वाच्या बातम्या –