विरोधात काम केल्याने उसाला तोडच नाही; मुळा कारखान्याविरोधात शेतकरी मागणार साखर आयुक्तांकडे दाद

नेवासा: सहकार क्षेत्रात सामन्य जनतेवर राजकीय दबाव असणे हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. याची दाहकता पश्चिम महाराष्ट्रात जरा जास्तच आहे पण नेवासा तालुक्यात सुद्धा एक शेतकरी या सहकाराच्या दबावाचा बळी झाला आहे. नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील शेतकरी जनार्दन रंगनाथ जाधव यांनी आरोप केला आहे की, राजकीय मतभेदातून उसाची नोंद असताना आणि मुळा कारखान्याचा सभासद असताना सुद्धा उसाला मुळा साखर कारखान्याने तोड दिली नाहीये.

या शेतकऱ्याने एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. पत्रकात जनार्दन जाधव या शेतकऱ्याने म्हटले आहे की, की मी मुळा कारखान्याचा सभासद आहे. विधानसभा निवडणुकीत मी विरोधात काम केले म्हणून २०१५ / १६ या वर्षी माझ्या ऊसाची नोंद असताना ऊस कारखान्याने नेला नाही व आता २०१७ / १८ नोंद घेत नसुन कारखाना व्यवस्थापन मला सुडबुध्दीची वागणूक देत आहे. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी दि ७ डिसेंबर २०१७ रोजी ऊस लागवड दुरूस्ती पत्रक लागवड हंगाम २०१७/२०१८ चे काढले होते. त्यामध्ये २६५ ऊसाच्या नोंदणी ३१ डिसेंबर पर्यंत स्विकारण्यात येतील असे म्हटले होते. त्यानुसार मी पाच वेळेस माझ्या २६५ ऊसाच्या जातीची नोंद देण्याचा अर्ज घेऊन गेलो तरीही व्यवस्थापनाने नोंद घेतली नाही. मुळा कारखान्याचा हमीभाव कमी असताना देखील मला ऊसाच्या नोंदी घेण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस आणुन गाळप करून त्या उत्पादकांना कमी भाव दिला दिला जातो व वजनही कमी दाखवता येते. माझ्या ऊसाची २०१५ / १६ ची नोंद असताना देखील ऊसाला राजकीय विरोधी काम करत असल्याने तोड दिली नाही. तो ऊस मी ज्ञानेश्वर कारखान्याला दिला. माझ्या प्रमाणेच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या देखील नोंदी कारखाना घेत नाही घेतली तर तोड देत नाही त्यामुळे मुळा कारखान्याच्या सुडबुदधीच्या व अडवणुकीच्या वागणूकीची तक्रार साखर आयुक्तांकडे करणार असल्याचे जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.

मी मुळा कारखान्याचा सभासद आहे. तरी पण माझ्या उसाची नोंद घेण्यासाठी गटप्रमुख, व मुळा कारखाना व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. विशेष म्हणजे माझी साखर पण बंद केली आहे. असे माझ्यासारखे तालुक्यात कित्येक शेतकरी आहेत.या माघे फक्त राजकीय कारण आहे.

जनार्धन जाधव ,शेतकरी