सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्याचा शेट्टी यांनी केला जाहीर सत्कार

टीम महाराष्ट्र देशा- दोन दिवसांपूर्वी शेट्टी यांच्या कार्यकर्त्याने खोत यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडी फोडली होती. ज्या कार्यकत्याने खोत यांच्या गाडीवर दगडफेक केली त्या कार्यकर्त्यांचा शेट्टी यांनी माळशिरस येथील स्वाभिमानाच्या सभेत जाहीर सत्कार केला आहे.कुर्डुवाडी येथे सदाभाऊ खोतांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता आणि त्याला जामीनही मिळाला. या घटनेनंतर खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर हा सत्कार दोघांमधील वाद अधिक विकोपाला नेणारा ठरू शकतो.

raju shetti and sadabhau khot

नेमक काय घडल होत
सदाभाऊ खोत हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कुर्डूवाडी येथील टोल नाक्यावरून बार्शीच्या दिशेने जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर शेतातील गाजरे, मक्याची कणसे फेकून मारण्यात आली. यामध्ये सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे.