उजनीची मायनस कडे वाटचाल

करमाळा – सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असलेली उजनी धरणाची वाटचाल मायनस कडे सुरू झालेली असून येत्या दोन दिवसांत मायनस होणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उजनी धरण असून ११७ टीएमसी इतकी क्षमता असलेली उजनी धरणाचा पाणी साठा कमालीचा कमी झालेला आहे.आज सोमवार दिनांक २१ मे सकाळी ६ वाजेपर्यंत ३.५६% इतका आहे.

गत वर्षी उजनी मायनस मधून प्लस मध्ये येऊन १२३% भरली होती, परंतु नियोजनाच्या अभावामुळे गेल्या वर्षभरात उजनीचा पाणी साठा कमालीचा घटलेला आहे. सध्या उजनी धरणात ३.५६% इतका पाणीसाठा शिल्लक असून येत्या दोन दिवसांत मायनस मध्ये जाणार आहे.

उजनी धरणातून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील प्रमुख पाणी पुरवठा योजना, पुणे, अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख लोकसंख्येला पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. मायनस मध्ये उजनी गेल्यामुळे पाण्याच्या टंचाई भासणार आहे.