fbpx

मान्सून 4 जूनपर्यंत केरळात दाखल होणार, मात्र महाराष्ट्रात दाखल होण्यास होणार उशीर?

महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळलेला शेतकरी आणि पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या महिला, तहानलेले आता मान्सूनची वाट पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला मान्सून कधी येणार याची प्रतिक्षा आहे. पण आता मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याची चिन्हे आहेत.

22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  स्कायमेटकडून सांगितले आहे.

Add Comment

Click here to post a comment