19 फेब्रुवारी ‘ड्राय डे’ घोषित करा : नितेश राणे

मुंबई – राज्यात शिवजयंती दिनी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दारू घरपोच मिळणार, अशा बातम्या माध्यमात आल्या होत्या. त्यानंतर, सरकारविरुद्ध चांगलाच सूर आवळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी चंद्रकांत बावनकुळे यांना लक्ष्य करत राज्यात शिवजयंती दिनी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे.

बार्शी तालुक्यातील जय शिवराय प्रतिष्ठानकडून गेल्या 4 वर्षांपासून शिवजयंतीदिनी ड्राय डे घोषित करण्याची मागणी होत आहे. यासाठी जय शिवराय प्रतिष्ठानकडून नितेश राणेंना पत्रही देण्यात आले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडावा आणि मंजूर करुन घ्यावा, असेही प्रतिष्ठानने आपल्या पत्रात म्हटले होते.