राज्यात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 4600 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल येथे दिली.

राज्यात सध्या 27 प्रवासी निरीक्षणाखाली असून त्यातील 10 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा जणांना मुंबई येथे, तीन जणांना पुणे येथे आणि एकाला नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने एनआयव्ही कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचाही अहवाल अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे रोज विचारपूस केली जात आहे.

‘करोना’ व्हायरसग्रस्त रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे – भगत सिंह कोश्यारी

पीक कर्जाचे वाटप १९ टक्क्यावरच ; खरीप पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या मुजोर बँकांवर कारवाई करा – अशोक चव्हाण