देशात ‘मंकीपॉक्स’ चा एकही रुग्ण आढळलेला नाही परंतु… – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – जगभरात कोरोना(Covid) महामारीने त्रस्त लोकांना आता मंकीपॉक्स(Monkeypox) आजाराचे नवे संकट चिंतेत वाढ करत आहे . World health organization ने आत्तापर्यंत फ्रान्स, स्वित्झर्लंड, अमेरिका, कॅनडा, स्पेन, इस्रायल, आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची 90 हून अधिक प्रकरणे नोंदवली आहेत. याची लागण झालेल्या लोकांना पाहून प्रत्येकाच्या मनात भीती वाढत आहे.

मंकीपॉक्स(Monkeypox) आजार दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे. आज इंग्लंड व अमेरिका या देशांमध्येसुद्धा मंकीपॉक्सचे(Monkeypox) बहुतांश रुग्ण आढळले आहेत. परंतु आपल्या देशात मंकीपॉक्सची(Monkeypox) एकही केस अद्याप आढळलेली नाही, अशी माहिती आरोग्य राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले कि ‘ हा विषाणू हवेतून प्रसारित होत नाही. ह्युमन टू ह्युमन टच किंवा ॲनिमल टू ह्युमन टच अशा माध्यमांतूनच तो पसरतो. पुरळ येणे, ताप येणे अशी या विषाणूची लक्षणे आहेत. चार आठवड्यांपर्यत या विषाणूचा संसर्ग राहू शकतो. या विषाणूचा मृत्यू दर १ टक्क्यांपासून ते १० टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे अहवालातून सांगण्यात आले आहे. एक-दोन दिवस ताप आणि पुरळ येण्याच्या दरम्यान या आजाराचा संसर्ग दुसऱ्यांना होण्याची शक्यता असते,

विमानतळावर स्क्रिनिंग सुरू केले आहे. या स्क्रिनिंगच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे एखाद्या व्यक्तीस आढळल्यास त्या व्यक्तीचे स्वॉब घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (national institute of virology) पाठवत आहोत. कस्तुरबा गांधी रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आरक्षित ठेवला आहे. डॉक्टरांची नेमणूक केली आहे. या आजाराशी लढण्याची निश्चितच तयारी ठेवली आहे. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये याबाबात जनजागृती केली जात असून सतर्कता म्हणून ही माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिली असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –