राज्यात कोणालाही वीज फुकट मिळणार नाही; वीजेचे बिल भरावेच लागेल – नितीन राऊत

मुंबई – मागील अनेक दिवसांपपासून राजकीय वर्तुळात वीज बिला मुद्दा चर्चेचा विषय बनलाय. यावरच आता राज्यात कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. महावितरण कर्ज काढून वीज विकत घेते. मग आम्ही लोकांना वीज फुकट कशी द्यायची, असा रोकडा सवाल राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी उपस्थित केला. त्यामुळे राज्य सरकार वीजबिलाची थकबाकी वसूल करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उर्जा विभागाची बाजू मांडली. जे लोक वीजेचा वापर करत असतील त्यांना बिल भरावेच लागेल. महावितरणला वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज फुकटात मिळत नाही, त्याचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरण बंद पडली तर त्याजागी खासगी कंपन्या येतील, असे नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटले. तसेच राज्याचा ऊर्जामंत्री या नात्याने मी एवढच सांगेन कि, शेतकऱ्यांच्या प्रत्त्येक प्रश्नांची मला जान आहे.

तसेच वीज ग्राहकांच्या प्रश्नांची देखील मला जान आहे. ज्यावेळी देशात कोळशाच्या अभावी वीज बंद पडली त्यावेळी इतर राज्य लोडशेडिंग झाले पण महाराष्ट्रात मी ते होऊ दिल नाही. कोरोनाच्या काळात, महापुराच्या वेळी आम्ही चांगल्या पद्धतीने वीज दिली. माझी नम्रपूर्वक सगळ्यांना विनंती आहे कि, वीज फुकटात मिळणार नाही. बिल हे भरावच लागेल.

महत्वाच्या बातम्या –