कोरोनावरील उपचार खर्चावर आता कोणताही टॅक्स वसुल केला जाणार

कोरोना

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. तर देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळेआरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तर राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. तर कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले.

अशा परिस्थितीत कोरोनावरील उपचार खर्चावर आता कोणताही टॅक्स वसुल केला जाणार नाही. असे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जर एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यास किंवा एखाद्या व्यक्तीस कोरोना उपचारांसाठी आर्थिक मदत पुरविली तर ती आर्थिक मदत कर्मचारी आणि लाभार्थीसाठी पूर्णपणे करमुक्त असणार आहे. तसेच कोरोना मृत्यूआधी झालेल्या हॉस्पीटलच्या खर्चावरही सरकार टॅक्स लावणार नाही. यासंदर्भातील घोषणा वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

त्यामुळे कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि हॉस्पीटलचा खर्च देण्यासाठी त्याच्या कुटुंबास कंपनीकडून मदत दिली गेली असेल तर ते आर्थिक मदत पूर्णपणे करमुक्त असेल. दोन्ही प्रकारचे फायदे आर्थिक वर्ष 2019-20 आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये उपलब्ध असतील. कोरोना बाधित व्यक्तींना ही मदत देण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात दुरुस्ती केली जाईल. असेही अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले.