मोदी सरकारचा एकही मंत्री चर्चेला आला नाही ; शेतकरी संघटना नाराज

मोदी सरकार

दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकराने पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांवर अनेक शेतकरी संघटना नाराज आहेत. परिणामी यावर चर्चा करण्यासाठी सरकारने शेतकरी संघटनांना दिल्लीत चर्चेसाठी बोलावले होते. मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकही मंत्र्यांने आजच्या या बैठकीला उपस्थिती लावली नाही. या बैठकीच्या ठिकाणी सरकारमधील एकही मंत्री फिरकला देखील नाही.

परिणामी, सरकारने आम्हाला बोलावून आमचा अपमान केल्याची भावना झालेल्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना कृषी भवनासमोरच कृषी कायदे फाडून निषेध नोंदवला. केंद्र सरकारने कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार व कृषि सेवा विधेयक 2020 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली त्यानंतर ती विधेयके मोठ्या गदारोळानंतर राज्यसभेतही मंजूर झालेत. तसेच या विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्याने त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पण ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा प्रचार झाला असून देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे.या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे. याचबरोबर घटक पक्षांची नाराजीही समोर आली आहे. देशातील अनेक शेतकरी भाजप नेत्यांच्याच घरासमोर आंदोलन करु लागल्याने शेतकरी संघटनांना चर्चेसाठी केंद्र सरकारने विनंती केली होती. अखेर याला होकार देत २९ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दिल्लीत पोचले होते. आजच्या बैठकीला केंद्रीय कृषी सचिव उपस्थित होते.परंतु, मोदी सरकारमधील एकही मंत्री उपस्थित नव्हता. यामुळे संतापून शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.अनेक राज्यांमध्ये या विधेयकांना विरोध झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-