शेतमाल खरेदी करण्याची तारीख शेतकऱ्यांना कळणार आता थेट एसएमएसद्वारे

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोयाबीन, उडीद, कापूस, मुग विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री केंद्रावर शेतकरयांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यासाठी शेतातली काम सोडून शेतकरी रांगेत तासंतास उभा राहून शेतमालाची विक्री खरेदी करत आहे. पण आता पणन विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढे शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी करण्याची तारीख आता थेट एसएमएसद्वारे कळणार आहे.

शेतकऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये या उद्देशाने ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. यासाठी शेतकरयांनी आपल्या जवळच्या खरेदी विक्री केंद्रावर नाव नोंदणी करने आवश्यक आहे. नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडने जरूरीचे आहे. त्याचबरोबर बँक पासबुक व सातबारा घेऊन जाणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरेदीची तारीख एसएमएसद्वारे कळवली जाईल. त्यानंतरच शेतकरयांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणायचा आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या खरेदी  केंद्रावर आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहनही पणन विभागाकडून करण्यात आले आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा वाया जाणारा नाहक वेळ वाचेल.