आता जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार

छगन भुजबळ

मुंबई – राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जून मध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्यामुळे ब्रेक दि चेन अंतर्गत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

हे कडक निर्बंध सध्या १ जूनपर्यंत लागू करण्यात आले असून निर्बंध शिथिल होणार की हेच निर्बंध लागू राहणार याकडं सर्व सामान्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या नियमांमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, काहीसा दिलासा देण्यासाठी गरजुंना मोफत शिवभोजन थाळी देण्यासह अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

आता, ‘कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच राज्य सरकारने अन्न धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे,त्याचबरोबर आता एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जुन महिन्यात प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील ७१ लाख ५४ हजार ७३८ एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार आहे,’ अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –