शेतकऱ्यांवर आता ” कोणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर” अशी म्हणण्याची वेळ आली

शेतकरी

शेतकऱ्यांचे जीवनमान हे शेतीवर अवलंबुन आहेच पण त्याबरोबरच ते पशुपालनावरही अवलंबुन आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यामध्ये पशुपालनाचा फार मोठा वाटा आहे. शेती ही फक्त पिकांचे उत्पादन यावर आधारीत न राहता त्याला असलेली पशुधनाची जोड ही फार महत्वाची आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीला पशुधनाची जोड असणे फायदेशीर आहे. जर शेतकऱ्यांचे हेच पशुधन जर धोक्यात असेल आणि त्याच्यावर इलाज करण्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जर गावात डॉक्टरच नसेल तर त्या शेतकऱ्याने काय करावे. असेच काहीसे कळवण तालुक्‍यातील पुनंद खोऱ्यात घडत आहे.

जाणून घ्या लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे

कळवण तालुक्‍यातील पुनंद खोऱ्यात एका अज्ञात रोगाची लागण झाली आहे ज्यामुळे अनेक म्हशींची पारडे ही मृत्युमुखी पडली आहेत. तेथील मोकभणगी, देसराणे शासकीय पशुवैद्यकीय केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नाहीत. त्यामुळे तेथील शेतकरी हे हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांवर आता “डॉक्‍टर देता डॉक्‍टर” असे म्हणण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर डॉक्‍टरची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे.

उद्योजकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांना मोक्का लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुनंद खोऱ्यातील देसराणे व मोकभणगी येथील दवाखान्यात दीड वर्षापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुधन संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही पशुधन वाचविण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी डॉक्‍टरांकडे उपचार घ्यावे लागत आहेत. तसेच या परिसरातील सहा ते आठ ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

दुधी भोपळ्यात दडलयं सुंदर त्वचेचं रहस्य ; घ्या जाणून कसे ते…

दुपारी जेवण झाल्यावर झोपल्याने होऊ शकतात ‘या’ व्याधी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही!!