आता कढीपत्त्याने नैसर्गिकरित्या केस करा काळे, जाणून घ्या कसे ते……

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या तब्येतीसोबतच आपल्या केसांकडे दुर्लक्ष करत असतो. धूळ, प्रदूषण यामुळे आपल्या केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस दिवसेंदिवस खराब होऊ लागले आहेत. केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर करत असतो. पण केमिकल प्रोडक्ट शिवाय अनेक असे घरगुती उपाय आहे ज्यामुळे आपण आपल्या केसांची निगा राखू शकतो.

अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. कढीपत्त्याच्या वापरानंतर पदार्थ अधिक जास्त चविष्ट बनतो. पण कढीपत्त्याचा उपयोग चांगल्या भाजीसाठीच नाही तर केसांची चांगली निगा राखण्यासाठी देखील आपण करू शकतो. कढीपत्त्यामध्ये अँटी-एक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. जे केसांची निगा राखण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे कढीपत्ता केसांच्या अनेक समस्या पासून आपली सुटका करू शकतो.

कढीपत्ता – केस निरोगी ठेवण्यासाठी एक रामबाण उपाय

अनियमित झोप, पोषक आहार न मिळाल्यामुळे आपले केस पांढरे होऊ लागतात. त्याचबरोबर मेलेनीनच्या कमतरतेमुळे आपले केस पांढरे होऊ लागतात. कढीपत्ता मेलेनिन तयार करण्याचे काम करते. त्यामुळे कढीपत्ता आपले केस पांढरे होण्यापासून रोखू शकतो. कढीपत्ता आपले केस निरोगी आणि मऊ सुद्धा बनवतो. त्यासाठी कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवून आपण तो आपल्या केसांना लावू शकतो.

कढीपत्त्याचा हेअर मास्क

  • कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर पॅनमध्ये दोन चमचे खोबरे तेल घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये दहा-बारा कडीपत्त्याचे पाने घालून तीन चार मिनिटे तेलामध्ये एकत्र करा.
  • तेल आणि कढीपत्त्याची पाने एकजीव झाल्यानंतर ते तेल थंड करून तुमच्या डोक्याला लावा.

हे टाळा

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार झाल्यावर तो थंड झाल्याशिवाय केसांना लावू नका. गरम तेल केसांना लावल्यास त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या –