आता शहरासोबत ग्रामीण भागातही मास्क बंधनकारक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायतींना आदेश

मास्क बंधनकारक

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. शहरासोबतच त्याचा शिरकाव आता ग्रामीण भागामध्येदेखील होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही मास्क बंधनकारक आहे. या कोरोना विषाणूमुळे देशाचे संपूर्ण आर्थिक गणित हे कोलमडले आहे. देशातील अनेक नागरिकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. तसेच यामध्ये शेतकऱ्यांचे देखील खूप हाल होत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने तसेच बाजारपेठा खुल्या झाल्याने दररोजच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यात नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे दिसत आहे. पान टपऱ्या देखील उघडून तंबाखू गुटख्याची विक्री सुरू आहे. त्यामुळे गावात पायी किंवा वाहनावर फिरत असताना पान, तंबाखू खावून थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले आहे.

पुढील चार दिवस पावसाचे; हवामान खात्याने महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना केला अलर्ट जारी

तसेच सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हवेली तालुक्‍यासह १३ तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग हा थुंकणे, शिंकणे आणि खोकल्यापासून होण्याची सर्वात जास्त भीती आहे. त्यामुळे सर्वानी नाका-तोंडाला मास्क लावणे हे अत्यंत गरजेचे आहे. नाका-तोंडाला मास्क लावल्याने संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.

अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत – अनिल देशमुख

शहरासोबतच आता ग्रामीण भागातही नागरिकांनी घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे हे बंधनकारक आहे. तसेच थुंकणाऱ्यांवर ५०० ते १००० रूपये दंड करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बँकांनी किरकोळ कागदपत्रांसाठी पीक कर्जप्रकरणे नामंजूर करू नये – सुनील केदार

 महत्वाच्या बातम्या –

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँका, बोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई – रामदास कदम

राजीनामे मागे घ्या ; अन्यथा पक्षांतरबंदीअंतर्गत कारवाई करू