आता साखर कारखाना ऊस थकबाकी असणाऱ्या शेतकर्‍यांना देणार कमी किमतीत साखर

साखर

अंबेडकरनगर – ऊसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकर्‍यांची अवस्था खूपच तंग आहे.  शेतकर्‍यांची शेती, शेतीची तयारी यामध्ये अडचणी येत आहेत. लग्न आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेकडो शेतकऱ्याची ऊस बिले साखर कारखान्यांकडून जमा करण्यास दिरंगाई करण्यात येत असून कारखान्यांनी ऊस बिले थकीत ठेवली आहेत. कोरोनाच्या संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच साखर कारखान्यानी शेतकऱ्याचे करोडो रूपये थकविले आहेत.

सावकारांकडून दरमहा होते १०० कोटींचे कर्जवाटप; १० लाख शेतकऱ्यांच्या जमिनीवर सावकारांचा बोजा

त्यामुळे ज्या शेतकर्‍यांची ऊस थकबाकी अजूनही कारखान्यांकडून देय आहे, त्या शेतकर्‍यांना 1 ऑगस्ट पर्यंत एक क्विंटल साखर कारखाना कमी किमतीत साखर देणार. शासनाच्या निर्देशावर वरील आदेश ऊस आणि साखर विभागाचे आयुक्त यांनी ऊस विभागाला पाठवले आहे.

बोगस बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना मुळावरच घाव घालावा – अजित पवार

ऊस अधिकारी डॉ. हरि कृष्ण गुप्त यांनी सांगितले की, शेतकरी आपल्या आधारकार्डवर कारखान्यातून साखर घेवू शकतो. वरील रक्कमेचे समायोजन ऊस थकाबकीमध्ये केले जाईल.

महत्वाच्या बातम्या –

सतत चिडचिड होत असेल तर याकडे थोडं लक्ष द्या

अंडी का खावीत ? जाणून घ्या फायदे