आता फक्त १ रुपयात मिळणार २ लाख रुपयांचा विमा

देशातील प्रत्येक नागरिकाला विमा पॉलिसीचा फायदा मिळण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेवाय) या योजनेच्या अंतर्गत नागरिकांना विम्याची सुविधा पुरवली जाणार आहे.

सुके खोबरे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

या योजनेच्या प्रत्येक वर्षाला ४०० रुपयांपेक्षा कमी खर्चात ४ लाख रुपयांचा विमा सरकार देणार आहे. या योजनेचा लाभ भारतातील कोणताही नागरिक घेऊ शकतो. यातून आपल्याला अनेक इंश्योरेंस कव्हर मिळतात. यात अपघात विमा, डिसएबिवलिटी कव्हर, आणि जीवन विमा कव्हर मिळतात.

तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना केंद्र सरकारची मोठी योजना आहे. याच्या अंतर्गत अपघात आणि डिसएबिलिटी कव्हर दिले जाईल. यासाठी फक्त १२ रुपायांचा खर्च येतो. म्हणजे आपल्याला एका महिन्यासाठी फक्त एक रुपया खर्च करायचा आहे. या योजनेच्या अंतर्गत विमा धारकांचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातात अपंगत्व आले तर २ लाख रुपयांचा मोबदला मिळत असतो. तर आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मोबदला मिळत असतो. या योजनेचा लाभ १८ ते ७० वर्षापर्यंतचा कोणताही नागरिक घेऊ शकतो.

गहू तांदळासोबत मक्याचेही ऑगस्ट महिन्यात होणार वितरण

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत आपल्याला ३३० रुपयात विमा संरक्षण मिळत असते. याप्रकारे तुम्हाला ३४२ रुपयांचा हप्ता जमा करावा लागणार. यात आपल्याला तीन विमा मिळतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेच्या लाभार्थी असेल आणि त्याचा मृत्यू जाल्यास नॉमिनीला २ लाख रुपयांचा विमा कव्हर मिळतो. १८ ते ५० वर्ष वयाची कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. ही विमा योजना ५५ वर्षापर्यंत लाईफ कव्हर देते.

महत्वाच्या बातम्या –

ड्रॅगन फ्रुटचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

लसणाचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या