आता तुम्ही घरबसल्या पाहू शकता तुमच्या ग्रामपंचायतीची कमाई; जाणून घ्या कसे ते……

ग्रामपंचायत

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुम्बई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

अनेक वेळा ग्रामपंचायतींमधून गैरव्यवहार चालत असल्याचे आपण ऐकत असतो. ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये पारदर्शकता असावी, आणि गावातील प्रत्येक नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा. पण काही गावांमध्ये सरकारी योजनांची माहिती ही नागरिकांना पूर्णपणे मिळताच नाही. त्यामुळे सरकार आता लहान-मोठ्या सरकारी खात्यांबरोबरच ग्रामपंचायतीचे डिजीटलीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायती डिजीटल करण्याचा सरकारचा हेतू असा आहे की, ग्रामीण भागातील कोणताही नागरिक हा सरकारी योजनांपासून वंचित राहू नये. तसेच सरकारकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या आर्थिक अंदाजपत्रकाची माहिती आता तुम्ही घर बसल्या मोबाईलवर किंवा संगणकावर पाहू शकता.

जर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पाहत असाल आणि त्यात तुम्हाला अनियमितता जाणवली किंवा दिसून आली तर तुम्ही त्यासंदर्भात तक्रारही करू शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन माहिती घेऊन सरपंच, जिल्हा प्रशासन यांच्या कामांवरही लक्ष ठेवू शकता.

चला तर मग जाणून घेऊया ग्रामपंचायतीला बजेट कसे मिळाले-

  • जर तुम्हाला ग्रामपंचायतीची माहिती पाहायची असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम http://planningonline.gov.in/ReportData.do?ReportMethod=getAnnualPlanReport या सरकारी वेबसाइटवर लॉगिंन करावे लागेल.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर त्याठिकाणी असलेले वर्ष निवडा. तसेच तुम्हाला या ठिकाणी २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ या वर्षाचा डेटा पाहता किंवा काढता येऊ शकतो.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही ज्या राज्याचे आहात ते राज्य निवडा. तसेच तुम्ही अन्य दुसऱे राज्य निवडून त्या राज्याचीही माहिती पाहू शकता.
  • राज्य निवडल्यानंतर योजना युनिटचा पर्याय येईल. जेथून तुम्हाला तुमची ग्रामपंचायत, ब्लॉक किंवा जिल्हा पंचायत निवडायची आहे. जसं की आपण ग्रामपंचायत निवडली.
  • दरम्यान, आता येथून गेट रिपोर्टची निवड करायची असून ग्रामपंचायतींच्या संपूर्ण कामाची माहिती मिळेल. जस की गावातील रस्ता निर्माण करण्यासाठी किती आर्थिक रक्कम मिळाली. तसेच त्यांचे काम कितपत पूर्ण झाले आहे का नाही, अशा अनेक योजनांची माहिती तुम्ही घरी बसून पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या –