‘या’ जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर!

कोरोना

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचा कहर सुरूच होता. काल दिवसभरात जिल्ह्यात ८२० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९ हजार १६७ एवढी झाली असून आत्तापर्यंत ४३ हजार ८५८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७५९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले १८, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ९, नेवासा ५, पारनेर ७, पाथर्डी १४, राहाता ४, संगमनेर ३, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ३, मिलिटरी हॉस्पिटल १६, इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ५५, अकोले ३५, जामखेड ६, कर्जत २, कोपरगाव ९, नगर ग्रामीण १७, नेवासा १२, पारनेर ६, पाथर्डी ७, राहाता ३५, राहुरी २२, संगमनेर १३६,  शेवगाव ५, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ४३, अकोले १३, जामखेड २५, कर्जत २५,  कोपरगाव ७, नगर ग्रामीण ३, नेवासा १९, पारनेर १४, पाथर्डी ३८, राहाता २१, राहुरी ३७, संगमनेर २६, शेवगाव २२, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –