‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांची संख्या ही हजारच्या घरात

कोरोना

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सहा हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत होती. मात्र, आता शहरातील कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचा आकडा हा नव्या रुग्णांपेक्षा अधिक असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होत असतानाच काल पुण्यात केवळ ६८४ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती.

मात्र, आज पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांची संख्या ही हजारच्या घरात गेली आहे. पुणे शहरात आज नव्याने १ हजार ०२१ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, २ हजार ८९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, उपचार घेणाऱ्या (ऍक्टिव्ह) १६ हजार ५२३ रुग्णांपैकी १,३६४ रुग्ण गंभीर तर ५,०१० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तसेच, ४६ रुग्णांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –