व्हॅलेन्टाईन्स-डे दरम्यान एक गुलाब तब्बल 30-50 रुपयाला !

दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी तरुणाई व्हॅलेन्टाईन्स डे सिलिब्रेट करण्यात गुंग असते. आपल्या आवडत्या व्यक्तीला पया दिवशी गुलाबाचे फुल,गिफ्ट्स,चॉकलेट्स असे अनेक प्रकार दिले जातात.मात्र यंदाच्या वर्षी हे प्रेम महागणार आहे. कारण यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलाबाचं उत्पादन वीस टक्के घटलं आहे.

रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता

त्यामुळे व्हॅलेन्टाईन्स डे दरम्यान बाजारात गुलाबाची कमतरता भासणार आहे. त्यामुळे प्रेमीयुगुलांना एका गुलाबासाठी 30 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत.वातावरणातील बदलाचा हा फटका शेतकऱ्यांना बसणार असताना, व्यापाऱ्यांचं मात्र फावणार आहे. कारण उत्पादन घटल्याने यंदा बाजारात गुलाबाची कमतरता भासेल. परिणामी व्यापारी प्रेमी युगुलांना लुटण्याची तयारी करत आहेत.