OnePlus 11 | ‘या’ खास वैशिष्ट्यांसह पुढच्या वर्षी लाँच होऊ शकतो OnePlus 11

OnePlus 11 | 'या' खास वैशिष्ट्यांसह पुढच्या वर्षी लाँच होऊ शकतो OnePlus 11

टीम महाराष्ट्र देशा: OnePlus गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नवीन मॉडेल वर काम करत आहे. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह बाजारात आपले मोबाईल (Mobile) लाँच करत असते. अशा परिस्थितीत चिनी मोबाईल उत्पादक कंपनी OnePlus पुढच्या वर्षी आपले OnePlus 11 हे मॉडेल लाँच करू शकते. या स्मार्टफोनच्या लाँचपूर्वी त्याच्या फीचर्स, कॅमेरा आणि इत्यादी गोष्टीबद्दल चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर मिळालेल्या रिपोर्टनुसार OnePlus 11 हा मोबाईल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन (Qualcomm Snapdragon) 8 Gen 2 चिपसेट सपोर्टसह येऊ शकतो. त्याचबरोबर हा मोबाईल नवीन रंगांमध्ये देखील लाँच जाऊ शकतो.

OnePlus ने आपला OnePlus 10 Pro हा स्मार्टफोन एमराल्ड फॉरेस्ट आणि व्होल्कॅनिक ब्लॅक या दोन नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. तर कंपनी OnePlus 11 हा स्मार्टफोन दोन नवीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करू शकतो. OnePlus 11 हा स्मार्टफोन मॅट ब्लॅक आणि ग्लोसी ग्रीन या कलरमध्ये बाजारात लाँच करू शकते.

OnePlus 11 स्पेसिफिकेशन

मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus 11 मध्ये देखील Oppo Find N2 सारखेच कॅमेरा स्पेसिफिकेशन देण्यात येणार आहे. OnePlus 11 आणि Oppo Find N2 कॅमेरा सोडल्यास यांच्या इतर हार्डवेअर स्पेसिफिकेशन वेगळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, OnePlus 11 या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध असू शकते. OnePlus 11 मध्ये 6.7 इंच QHD+AMLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

कॅमेरा 

OnePlus 11 या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि टेलिफोटो कॅमेरा देण्यात येणार आहे. तर यामध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.

फीचर्स

OnePlus 11 या स्मार्टफोनमध्ये Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते. त्याचबरोबर या मोबाईलच्या स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 16 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते. कंपनीचा हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करू शकतो. भारतीय बाजारामध्ये OnePlus 11 या मोबाईलची किंमत 43,490 रुपये एवढी असू शकते.

महत्वाच्या बातम्या