लॉकडाऊनमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन;  प्रति किलो 20 रुपये दर मिळावा अशी मागणी

कांदा

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाचं बसला आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिकिलो 5 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झाले आहे. यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ट्विटरवर आंदोलन केले आहे.

सध्या कांद्याला अतिशय कमी दर मिळत आहे. किमान प्रति किलो 20 रुपये तरी दर असावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने ट्विटरच्या माध्यमातून आंदोलन केले आहे. सध्या जमावबंदी असल्याने थेट रस्त्यावर उतरणे व आंदोलन करण्यास अडचणी आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांनी आंदोलनाची अनोखीपद्धत अवलंबली आहे.

वजन कमी होत नाहीये? तर मग कलिंगड खा, वजन कमी करण्यास कलिंगड फायदेशीर

मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून कांदा उत्पादक अडचणीत आहेत. खरिपाच्या तोंडावर हातात भांडवल नसल्याने कांदा विक्रीसाठी आणला जात आहे, मात्र त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. बाजार समित्याही बहुतांशी बंद आहेत. अशा स्थितीत राज्यातील कांदा उत्पादकांनी कांदा विक्री कसा करायचा याबाबत मोठी समस्या

निर्माण झाली आहे. त्यामुळे या विषयावरही लक्ष द्या, ही भूमिका घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे. सरकारचे याकडे लक्ष वेधले जाणार आहे. यापूर्वी संघटनेने निर्यात खुली करण्याबाबत अशा पद्धतीने आंदोलन केले होते. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना लक्ष्य केले जात आहे.

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी