कांद्याच्या दरात दुसऱ्या दिवशीही घसरण! …..त्यामुळे नाफेडने राज्यातील शेतकऱ्यांकडून ‘या’ भावाने कांद्याची खरेदी करावी

कांदा उत्पादक

नाशिक – कांदा हे भारतातील एका महत्त्वाचे पीक आहे. कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऍलियम सेपा आहे. कांदा ही द्वैवार्षिक वनस्पती आहे, परंतु सामान्यत: वार्षिक म्हणून घेतले जाते. भारतात अनेक राज्यांमध्ये कांद्याचा वापर रोजच्या आहारात केला जातो. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते, परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. कांद्याची भाजी केली जाते. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो. कांद्याच्या पातीपासूनसुद्धा भाजी, झुणका इ. पदार्थ केले जातात. म्हणून कांदा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक खूप महत्त्वाचा भाग आहे.

तसेच कांद्याची आयात आणि निर्यात होताच असते. पण आता सध्याच्या काळात कांद्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. तसेच ते भाव कसे कमी करता येतील यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी सरकारने कांदा आयात केलेला आहे, त्यामुळे कांद्याच्या दारात घसरण होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाजार समितीत कांदा दरात घसरण होत असल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त आहे. तसेच नाफेडच्या माध्यमातून १५ हजार टन कांदा आयात करून ५ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होणार आहे. यामुळे राज्यातील कांद्याचे भाव हे पडतील.

कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने अशी मागणी केली आहे की, नाफेडने राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमधूनच कांदा ५ हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करावा. तसेच हा कांदा खरेदी केल्याने कांदा उत्पादकांचे जे नुकसान होणार आहे ते थांबवता येईल.

तसेच सरकारने यामध्ये केवळ ग्राहकांचे हितच डोळ्यासमोर ठेवले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे खूप आर्थिक नुकसान होत आहे, तसेच राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये सरकार विरोधात मोठी संतापाची लाट आहे.

महत्वाच्या बातम्या –