नागपूरमध्ये कांद्याच्या दरात घसरण, लसूण मात्र आवाक्याबाहेर

नागपूरमध्ये कांद्याच्या दरात घसरण, लसूण मात्र आवाक्याबाहेर garlic and onion

कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यानंतर वाढलेल्या भावात फेब्रुवारी मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचे भाव ३५ ते ४० रुपये आहेत. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मार्चनंतर उन्हाळी कांदा निघाल्यानंतर भाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त  करण्यात येत आहे. कळमन्यात प्रती किलो ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचलेले भाव आवक वाढल्याने बरेच कमी झाले आहेत. कळमना आलू-कांदे बाजारात उत्तम दर्जाचे कांदे २० ते २२ रुपये, मध्यम १३ ते १७ आणि हलक्या दर्जाचे भाव ५ ते १० रुपये आहेत. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा कमी होतील.

जाणून घ्या चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे…

यावर्षी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी कांद्याला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची जास्त लागवड केली. परिणामी काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे चांगले पीक येण्याचा अंदाज आहे.

जाणून घ्या सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे….

दरम्यान यावर्षी मुसळधार पावसामुळे लसणाचे पीक खराब झाल्यामुळे भाव आकाशाला भिडले आहेत. गेल्यावर्षी ठोक बाजारात ६० ते ७० रुपये भाव होते. यावर्षी टंचाईमुळे १५० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. यावर्षी लसूण उशिराच बाजारात आला. जुन्या मालाची टंचाई असल्याचा परिणाम भाववाढीवर झाला. सध्या १५ ते २० टक्के नवीन माल आणि जवळपास ८० टक्के जुना माल येत आहे.