कोरोना महामारीमुळे सर्व बाजारपेठा बंद आसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

कांदा निर्यात बंदी

उस्मानाबाद – कोरोना महामारीमुळे सर्व बाजारपेठा बंद आसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचा जबर फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. विक्रीच नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा घरात, गोठ्यात आणि शेतातच सडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत तसेच मागिल वर्षीही कोरोनाचे संकट आसल्याने कांद्याचा साठा तसाच पडून राहीला आणि बाजारपेठ पुर्णता: बंद होती. या वर्षाही लॉकडाऊन लागला आसल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला असून शासनाने मदत देण्याची मागणी होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसाचा लॉकडाऊन संपत असतानाच तो आणखी ३० एप्रिलपर्यंत वाढवला गेला आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील कांदा पिकाची काढणी करत आहे. सध्या मार्केट बंद असल्यामुळे हा काढलेला कांदा साठवून ठेवण्यासाठी कांदा चाळ बनवण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहे. काही शेतकरी मात्र शेतातच झाडांच्या सावली खाली कांदा साठवून ठेवताना दिसत आहेत. शेतात बांधावर कांद्याला ६०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

मागील खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त नुकसान सोसावे लागले होते, शेतकऱ्यांना माल विक्री होत नसल्याने माल तसाच शेतात पडून राहत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. राज्यातील सर्व सीमा बंद असल्यामुळे वाहतूकही पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे कांदा व्यापारीही मर्यादीतच कांदा खरेदी करत आहेत. २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात शेतातील कांदा, गहू या पिकासह सर्वात जास्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

महत्वाच्या बातम्या –