राज्यात माघील वर्षी चांगला पाऊस होत असल्याने ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली असून कांदा(Onion) लागवीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे दिसत आहे.
ह्या वर्षी उत्तर महाराष्ट्रामध्ये २ लाख ६५ हजार हेक्टर कांदा(Onion) लागवड करण्यात आली आहे. माघील वर्षीचा आकडा बघता ७३ हजार हेक्टरनी वाढला त्यामुळे मोठे उत्पादन होईल असा अंदाज होता परंतु कांदा(Onion) काढणीच्यावेळी उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक, जळगाव, धुळे नंदुरबार जिल्ह्यात उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे बघायला मिळाले.
एकरी उत्पादनात नाशिक व धुळे जिल्ह्यांचा आकडा बघता ३० टक्क्यांपासून ५० टाक्यांपर्यंत उत्पादन घटल्याचे समोर आले आहे.
नाशिक,धुळे,जळगाव जिल्ह्यात ५० हजार हेक्टरनी वाढ झाली, तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याकडे कल वाढला आहे मात्र जर पाहिले गेले तर उप्तादन व उत्पन्न हे व्यवस्तीत झालेले नाही. आढावा घेतला असल्यास एकरी उत्पादनात घट आणि प्रतवारीमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. कांदा(Onion) उत्पादक शेतकरी कांदा(Onion) विकत असला तरी उत्पादन खर्चा पेक्षा कमी दर मिळत आहे. म्हणून शेतकऱ्यांची कोंडी होत असून उत्पादन व दर ह्यांचे गणित बघिडले आहे. असे कृषी विभागाने म्हंटले आहे.
नाशिक मधील येवला, देवळा, मालेगाव, चांदवड तालुक्यात अनेक कांदा(Onion) उत्पादकांचे उत्पादन एकरी उत्पादनापेक्षा निम्म्यावर आले आहे.
कांदा(Onion) उत्पादनातील अडचणी बघता शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रमुखता मजूरटंचाईचा भीषण प्रश्न असून मजूरटंचाईमुळे लागवड आणि काढणी लांबणीवर जात आहे तसेच, कांद्याला अपेक्षित असलेला आकार मिळत नाहीये गोल्टी तसेच चिंगळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच करपाजन्य रोगां मुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे तसेच ह्या वर्षी बुरशीजन्य रोग हा अधिक आहे.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या वीज कुठे पडणार? ‘दामिनी’ अँप द्वारे मिळणार माहिती!
- ग्रामीण भागात ‘तंत्रज्ञान प्रणाली’ वापरून आरोग्ययंत्रणा मजबूत करा, असे नि
- खुशखबर : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन,असा करा अर्ज.
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; केंद्र सरकारने खतेविक्रीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय !
- राज्यात दुबारपेरणीचे संकट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई क